पुणे

“लोकांना खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांशी आपली लढाई आहे, “मतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. अमोल कोल्हे यांना संसदेत पाठवा – आ.जयंत पाटील”

नारायगाव : लोकांना खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांशी आपली लढाई आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा द्वेष करणारे खासदार नकोत, अस म्हणत देशात इंडिया आघडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

नारायणगाव मध्ये आयोजित महाविकास आघाडीतील राशी7 काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, शिवसेना (उबाठा) नेते भास्करराव जाधव, सत्यशील शेरकर, उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

 

जयंत पाटील म्हणाले की, या निवडणुकीत 32-33 जागा महाविकास आघाडीच्या असतील. देशातल वार बदललं आहे. संविधान वाचवण्यासाठी, चुकीच्या पद्धतीने होणारी जीएसटीची आकारणी रोखण्यासाठी लोक आता एकत्र आलेत. त्यामुळे चारशे पारचा नारा देणाऱ्यांना आता दोनशे गाठतो का नाही याची चिंता लागली आहे. खोके घेऊन बोके घेणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्राची मानसिकता झाली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांना पाडायचे अनेक प्रयत्न झालेत. असे सांगत जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांची साथ सोडण्यासाठी, अमोल कोल्हेंवर जेवढा दबाब आला तेवढा कोणावर आला नाही. तरीही या दबावाला बळी न पडता, ते आपल्या तत्वांवर ठाम राहिले. त्यांचा पराभव करण्यासाठी बारा बारा सभा घ्यावा लागत

“अनाजी पंताची ओळख करुन दिली, म्हणून मूठभर लोकांना त्रास…

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगताना अनाजी पंताची ओळख महाराष्ट्राला करुन दिली.म्हणून काही मूठभर लोक चिडून आहेत. पण ही लढाई तत्वांची, विचारांची आहे.

“अमोल कोल्हे होणार कारभारी जयंत पाटलांनी केलं स्पष्ट…

तीन महिन्याने विधानसभा येणार आहेत, आपलं सरकार येणार आहे, आणि अमोल कोल्हे जे म्हणतील तेच या भागात होणार आहे, अस सांगत जयंत पाटील यांनी डॉ. कोल्हे हेच आता कारभारी असतील हे स्पष्ट केल.

ही लढाई तत्वांची, विचारांची आहे. खोके घेऊन बोके झालेल्याना लोक आता धडा शिकवणार आहेत.

अमोल कोल्हेंना पाडायचे किती प्रयत्न करावेत, अमोल कोल्हे काम करत नव्हते, लढायला तयार नव्हते अस सांगता तर बारा बारा सभा का घेता, असा सवाल अजित पवार यांचे नाव न घेता जयंत पाटलांनी केला.लोकसभेत प्रेमाने मत मागावी, मग दोनाची चार होतात, पण दमबाजी केली की आठाची दोन होतात. 4 जूनला आढळरावांना समजेल, प्रचार त्यांचा होता की कोल्हेंचा होता, असा टोलाही लगावला.