आंबेडकर जयंतीचा आनंद क्षणात शोकांतिकेत बदलला… यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-घाटंजी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
गुरगुल्ला कुटुंब आंबेडकर जयंती साजरी करून आदिलाबादकडे परतत होते. मात्र साखरा गावाजवळ त्यांच्या चारचाकीची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली.
या अपघातात वडील साईकिरण गुरगुल्ला आणि केवळ सहा महिन्यांची चिमुकली हंसिका यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला… तर आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हृदयद्रावक घटनेत महिलेच्या डोळ्यासमोरच नवरा आणि लेकरानं प्राण सोडले… ही वेदना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक डॉक्टर आणि समाजसेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
सणाच्या दिवशी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.
