पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
२१ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकांसाठी
भाजपने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी
नगरसेवकांच्या नावांची शिफारस केली आहे.
विशेष म्हणजे,
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयासाठी राघवेंद्र उर्फ बाप्पू दीपक मानकर
तर
वारजे-कर्वेनगरसाठी मंजुश्री संदीप खर्डेकर
यांना संधी देण्यात आली आहे.
आता पाहूया पूर्ण यादी 👇
नगर रोड-वाघोली – अनिल दिलीप सातव
येरवडा-वडगाव शेरी – कविता महेंद्र गलांडे
ढोले पाटील रोड – राष्ट्रवादी काँग्रेस (अप गट)
छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड – अमृता राम म्हेत्रे
औंध-बाणेर – रोहिणी सुधीर चिमटे
कोथरूड-बावधन – वासंती नवनाथ जाधव
वारजे-कर्वेनगर – मंजुश्री संदीप खर्डेकर
सिंहगड रोड – सचिन रावसाहेब मोरे
धनकवडी-कात्रज-आंबेगाव – प्रतिभा रोहिदास चोरगे
कोंढवा-उंड्री – रंजना पुंडलिक टिळेकर
हडपसर-मांजरी – प्रशांत उर्फ मामा तुपे
वानवडी – (नाव जाहीर नाही)
बिबवेवाडी – मनीषा प्रवीण चोरबोले
कसबा पेठ – उज्वला गणेश यादव
विश्रामबागवाडा – राघवेंद्र दीपक मानकर
या शिफारसी नगरसचिव योगिता भोसले-निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे आणि सभागृह नेते गणेशराव बिडकर उपस्थित होते.
आता लक्ष लागलंय २१ एप्रिलकडे…
या निवडणुकीत कोण बाजी मारणार?
पुण्याच्या राजकारणात काय बदल होणार?
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
BJP Candidates List Out | 15 प्रभाग समित्यांसाठी नावे जाहीर
