पुणे

मुंबईत धक्कादायक प्रकार! 😳 देवीच्या मिरवणुकीत तरुण क्रेनला लटकला

मुंबईतील मालाडमध्ये देवीच्या मिरवणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका 23 वर्षीय तरुणाने नवस फेडण्यासाठी स्वतःच्या शरीराला हुक लावून थेट क्रेनच्या साहाय्याने सुमारे 15 फूट उंचीवर लटकत मिरवणुकीत सहभाग घेतला.

या प्रकारामुळे त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.
पोलिसांनी याआधीच अशा प्रकारांना मनाई केली होती, तरीही हा अघोरी प्रकार करण्यात आला.

घटनेनंतर मालाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या तरुणावर, मिरवणुकीच्या आयोजकांवर आणि क्रेन चालकावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

चौकशीत तरुणाने सांगितले की, इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी त्याने हे कृत्य केले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि धोकादायक प्रथांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.