यवतमाळमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मटण नीट शिजले नाही, या क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा मित्रासमोर अपमान केला… आणि त्याचाच गंभीर परिणाम झाला.
आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे 33 वर्षीय चेतना जाधव हिने अपमान सहन न झाल्याने विष प्राशन केले.
तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, पती मनोज जाधव हा व्यसनी आणि संशयी स्वभावाचा होता.
यापूर्वीही त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या घटनेमुळे एका छोट्याशा वादाने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
