पुणे

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून आरटीई प्रवेश मिळवून देणारी टोळी गजाआड, हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन):

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून शहरातील नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेश मिळवून देणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रवेशाच्या नावाखाली आतापर्यंत या टोळीने लाखोंची माया जमा केली आहे.

दीपक विठ्ठल गरुड (३६, रा. महादेवनगर, मांजरी रोड), सचिन रतन बहिरट (३६, रा. माळवाडी, हडपसर), सुधीर अभिमन्यू काकडे (३५, रा. तुपेनगर, माळवाडी, हडपसर), ऋषिकेश भानुदास ढमाले (२८, रा. टाकवे खुर्द, मावळ), अनिकेत सुरेश शिंदे (२६, रा. शुक्रवार पेठ, हिराबाग) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी तक्रार दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हडपसर येथील मेघराज लॉजमध्ये पालकांना बोलावून आरटीईअंतर्गत अ‍ॅडमिशनसाठी आर्थिक व्यवहार केला जात असल्याची माहिती सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा मारला. यावेळी आरोपींच्या ताब्यातून दोन लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटर, बनावट पत्ते असलेली आधारकार्ड, उत्पन्नाचे दाखले, विविध खात्यांचे बोगस रबरी शिक्के जप्त करण्यात आले आहेत.

एका प्रवेशासाठी पालकांकडून एक ते दीड लाख रुपये घेत असून, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रवेश मिळवून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. २०१८ मध्ये देखील या टोळीने अशाच बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करत अनेक प्रवेश करून दिले होते. या वर्षीदेखील शेकडो विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रे तयार करून प्रवेश मिळवून दिला असल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कामगिरी उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे, संजय चव्हाण, कर्मचारी रमेश साबळे, अकबर शेख, राजेश नवले, संपत अवचारे यांच्या पथकाने केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 months ago

Awesome blog! Do you have any tips and hints for aspiring writers?
I’m planning to start my own website soon but I’m a little lost on everything.

Would you recommend starting with a free platform like
Wordpress or go for a paid option? There are so many choices out there
that I’m totally overwhelmed .. Any suggestions? Cheers!

5 months ago

Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x