ॲड. गुणरत्न सदावर्ते याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या विषयी असभ्य,अपशब्द वापरून मराठा समाजाच्या भावना भडकवणारी विधान केले आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्यासह मराठा समाजासाठी लढणाऱ्या मराठा नेत्यांना अफजल खान ची उपमा देऊन त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज संभाजी ब्रिगेड च्या वतीने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या एमपीएससी या परीक्षेबाबत मराठा क्रांती मोर्चा च्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह कार्यक्रमांमध्ये ऍड. गुणरत्न सदावर्ते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा लाईव्ह कार्यक्रम टेलिकास्ट करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुरु असलेल्या चर्चे दरम्यान ऍड गुणरत्न सदावर्ते याने छत्रपती संभाजी राजे आणि मराठा नेते यांच्या विषयी असभ्य आणि अपशब्द वापरून बदनामी केली आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते याचा उद्देश महाराष्ट्रामधील कायदा व सुव्यवस्था बिघडुन जातीय दंगली निर्माण करण्याचा आहे. भारतीय संविधानाच्या आडून तो भावना भडकीवण्याचा खेळ खेळत आहे. त्यामुळे त्याच्यवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश टेळेपाटील, मारुती काळे,सुनील हरपळे आदी यांनी केली आहे.
