शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांवरील वाद आता आणखी चिघळताना दिसत आहे. सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता त्यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
गिरीजा यांच्या आईने दावा केला की, गेली तीन वर्षे सामोपचाराने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी विनायक राऊत यांनी केलेले आर्थिक मागण्यांचे आरोप फेटाळून लावत, “आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही तीन वर्षे थांबलो नसतो,” असे म्हटले.
याचबरोबर त्यांनी गिरीजाच्या पतीकडून मानसिक त्रास झाल्याचा आरोप केला आणि, “शारीरिक संबंधच होणार नाहीत तर मुलं होणार कशी? डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अंधश्रद्धेचा आधार घेतला गेला,” असा गंभीर दावा केला.
दुसरीकडे, विनायक राऊत यांनी सर्व आरोप नाकारत हे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. पुढे या प्रकरणात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“शारीरिक संबंधच होणार नाहीत तर…!” विनायक राऊतांच्या मुलाबाबत गिरीजाच्या आईचा मोठा गौप्यस्फोट
