पुणे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना समोर आली आहे. लक्ष्मी रोड परिसरात तरुणांना अडवून अटकेची भीती दाखवत पैसे उकळल्याच्या आरोपावरून फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
पुण्यातील विजय मारुती चौक, लक्ष्मी रोड परिसरात २९ जून रोजी रात्री नाकाबंदी सुरू होती. यावेळी तिघा तरुणांना अडवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत पैसे उकळल्याचा आरोप दोन पोलिसांवर करण्यात आला आहे.
या प्रकरणात राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपानुसार, त्यांनी एका महिलेच्या QR कोडवर २ हजार रुपये स्वीकारले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही पोलिसांना तात्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर विभागीय तसेच कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
लक्ष्मी रोडवर खंडणीप्रकरण! दोन पोलिस तात्काळ निलंबित
