पुण्यातील हायप्रोफाईल हुक्का पार्टीवर काळेपडळ पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. पिसोळी येथील एका फार्महाऊसवर विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी अचानक छापा टाकला.
गुप्त माहितीच्या आधारे रात्री सुमारे १० वाजून १५ मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. छाप्यात प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स, विदेशी हुक्का पॉट्स, महागडे मोबाईल आणि मर्सिडिज, थार, फॉरचुनरसह अनेक आलिशान वाहनांचा समावेश असलेला तब्बल ७५ लाख ८० हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हुक्का पार्लर चालवणाऱ्यांसह हुक्का पार्टीत सहभागी असलेल्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.
पुण्यातील हायप्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश! पोलिसांनी फार्महाऊसवर टाकला छापा, 12 जणांवर गुन्हा दाखल.
