पुणे जिल्ह्यातील आळंदीत घरातून तब्बल ८ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान माउली मंदिराजवळील साळी धर्मशाळेसमोरील घरात ही चोरी झाली. फिर्यादी लता अंकुश चौधरी यांच्या हँडबॅगमधील पर्स काढून त्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शिवानी निलेश जाधव, वय २३, हिच्याविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
आळंदीत घरातून ₹8.10 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी! 23 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल.
