पुणे

“साहीत्य सम्राटचा कवी भारत जिंकतो – जेष्ठकवी चंद्रकांत जोगदंड..

साहित्य सम्राट मध्ये घडलेला कवी चांदा ते बांदापर्यन्त आपली कीर्ती वाढवतोच. तो महाराष्ट्रच नाही तर साऱ्या भारतात प्रसिध्द होतो. गेली दहा बारा वर्षे मराठी भाषेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या साहित्य सम्राटचे हे श्रेय आहे. असे मत जेष्ठकवी चंद्रकांत जोगदंड यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
साहित्य सम्राटचे १५९ वे कविसंमेलन लोहिया उद्यान हडपसर येथील पुणे म. न.पा.मराठी भाषा संवर्धन साहित्यिक कट्ट्यावर संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी प्रस्तावनेतुन केली. ते म्हणाले या साहित्य सम्राटच्या मातीतून महामंचावर अनेकजन गेले. तो साहित्य सम्राटचा अभिमान आहे. हे कार्य पुढे नेहण्यासाठी प्रत्येक मराठी मनाची गरज आहे.
यावेळी इंटरनेटमुळे माणसातील संवाद विसरत चालला आहे. त्यामुळेच तो संवाद नीत्य होण्यासाठी साहित्य सम्राट आणि साहित्यातील सम्राट विनोद अष्टुळ हे पुणे आणि पुणे पूर्व विभागात सातत्याने कार्य करत आहेत. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,लेखक सुधीर मेथेकर यांनी मांडले.
यावेळी देहू, चासकमान, भोर, पिंपरी, मुंढवा, चिंचवड, येरवडा, धनकवडी, घोरपडी, दौंड, धायरी, डाळिंब, लोणी, कोंढवा, उरुळीकांचन, भोर आणि हडपसर पंचक्रोशीतील अशा दिग्गज चाळीस कवि-कवयित्रींनी आपल्या बहारदार विविध आशयांच्या कविता सादर करून काव्यरसिकांची मने जिंकली.
यामध्ये आदरणीय कवी रोहिदास बिचकुले, शिवाजी उराडे, प्रल्हाद शिंदे, विलास कुंभार, अरुण कांबळे, देवेंद्र गावंडे, शिवाजी ननवरे, अशोक शिंदे, उध्दव महाजन, कांचन मुन, प्रमिला शिंदे, आनंद गायकवाड, रमेश जाधव, भारत मस्तुद, योगेश हारणे, सूर्यकांत नामुगडे, लक्ष्मण शिंदे, तानाजी शिंदे, अशोक वाघमारे, बबन धुमाळ, आशाताई शिंदे, सुरेश धोत्रे, सीताराम नरके, शहाजी वाघमारे, जनाबापू पुणेकर,पांडुरंग मस्के आणि नानाभाऊ माळी इत्यादींनी बहारदार सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी तर गोड आभार किशोर टिळेकर यांनी व्यक्त केले.