पुणे

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट’- २६ सप्टेंबर रोजी  ऑनलाईन आयोजन

पुणे :

भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या वतीने ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट’ चे आयोजन  ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. २६ सप्टेंबर रोजी  सकाळी ११ वाजता ही परिषद होईल.भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थितीत उदगाहतां होईल.  

 भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली.  या परिषदेचे हे आठवे वर्ष आहे. व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी,प्राध्यापक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहून संवाद साधतील. 

‘उद्योग आणि अर्थव्यवस्थेपुढे नवनवीन आव्हाने उभी राहत असली तरी व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आणि इंडस्ट्री यांनी एकत्र येवून, ही आव्हाने पेलून दाखवली पाहिजेत. त्यासाठी विचारांचे आदान प्रदान व्हावे यासाठी ही परिषद आयोजित करण्यात येत आहे,असे डॉ सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x