एवरेस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेने महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात वेशभूषा स्पर्धा, रॅम्प वॉक तसेच अनेक फनी गेम्स घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालक महिलांनाही आनंदाने सहभाग घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमासाठी स्नॅक्सचीही व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाला Mrs. Universe Central Asia क्रिथी शेट्टी तसेच साधना बॉईज स्कूलच्या सुपरवायझर माधुरी राऊत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय विनोद सालवे (डायरेक्टर), अपर्णा झांबरे (सेंटर हेड), राघवेंद्र चौहान (कॉर्पोरेट डिपार्टमेंट हेड, इनामदार हॉस्पिटल) तसेच * विमल सुरेश अरू (PTA सदस्य)* यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात असून त्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. काही विद्यार्थी खेळासोबतच तबला, गिटार, पियानो यांसारखी वाद्येही शिकत आहेत. त्यामुळे केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर कला आणि छंदांनाही येथे प्रोत्साहन दिले जाते.लहान मुले पाहून अधिक शिकतात या विचारातून शाळेच्या भिंतींवर विविध प्राणी, निसर्ग आणि शैक्षणिक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही शाळेशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात येत आहे.
