पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी?
पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या ई-मेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच RSS मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.
धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क झाला असून, ई-मेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, तो खरा आहे की बनावट, याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे.
सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
