पुणे

नंदाताई आंबनावे यांच्या प्रयत्नांना यश! केशवनगरातील रस्त्याचे तात्काळ कॉंक्रिटीकरण

केशवनगर येथील पीएमपीएमएल बसथांब्यासमोरील खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका सौ. नंदाताई अनिल आंबनावे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या तात्काळ कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
दरम्यान, वृत्तमाध्यमांनीही हा प्रश्न प्रभावीपणे मांडल्यानंतर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत अल्पावधीतच काम पूर्ण केले.
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. स्थानिक नागरिकांनी नंदाताई आंबनावे यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशाच प्रकारे परिसरातील इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास नंदाताई आंबनावे यांनी व्यक्त केला आहे.