पुणे

भेसळयुक्त दूध-पनीर प्रकरणात मोठी मागणी! अमोल तुपेंचा सरकारला इशारा…….

भेसळयुक्त दूध, पनीर आणि भाजीपाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
तुपे यांनी सांगितले की, बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकल वापरून दूध, पनीर, फळे आणि भाजीपाला विकला जात आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे.

त्यामुळे अन्नसुरक्षा विभागाने तातडीने FSSAI परवाना तपासणी मोहीम राबवावी, भेसळयुक्त पदार्थ जप्त करावेत आणि त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच परवाना नसलेल्या युनिट्सवर छापे टाकून भेसळ करणारे विक्रेते, स्टॉकिस्ट आणि वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, इतकेच नव्हे तर गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय काही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात आले असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आणि जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर क्रांती शेतकरी संघटना जनआंदोलन छेडणार आणि कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.