पुणे

NCP मध्ये सर्व काही आलबेल? 22 आमदारांच्या चर्चेवर भुजबळांचा मोठा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.
20 ते 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील देवगिरी शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला मंत्री, आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला.
ते म्हणाले…
“सर्व आमदारांनी छातीठोकपणे सांगितलं की आम्ही पक्षासोबतच आहोत. आम्ही कुणाच्या संपर्कात नाही.”
दरम्यान, पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या हातात गेल्याची चर्चा सुरू आहे.
तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.
मात्र संबंधित नेत्यांनी नाराजी फेटाळून लावली आहे.
या बैठकीत निवडणूक आयोगाच्या SIR प्रणालीवर चर्चा झाली.
तसंच 10 जूनला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाबाबतही महत्त्वाची चर्चा पार पडली.
आता राष्ट्रवादीत खरंच सर्व काही आलबेल आहे का?
की अजूनही पडद्यामागे काही वेगळं सुरू आहे?