सोशल मीडियावर ओळख…
गोड गप्पा… प्रेमाचं नातं… आणि मग लाखोंची फसवणूक…
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका मोठ्या ‘लव्ह स्कॅम’चा पर्दाफाश झाला आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रे नावाच्या हायप्रोफाईल लव्ह स्कॅमरला ताब्यात घेतलं आहे.
पोलिस तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.
आदर्श म्हात्रेने तब्बल 100 पेक्षा जास्त तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची कबुली दिल्याचं समोर आलं आहे.
पनवेलमधील तुराडे गावचा रहिवासी असलेला आदर्श सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साइट्सवरून तरुणींशी संपर्क साधायचा.
सुरुवातीला मैत्री…
नंतर प्रेम…
आणि मग लग्नाचं आमिष दाखवत विश्वास संपादन करायचा.
यानंतर संबंधित महिलांच्या नावावर विविध बँकांतून लाखो रुपयांची कर्जे काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे…
फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला या उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
काही महिलांसोबत आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचाही आरोप आहे.
त्यानंतर विविध कारणं सांगून पैसे उकळले जात होते.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागांत आरोपीवर 11 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी त्याचं बँक अकाउंट सीज केलं असून त्यात तब्बल 9 कोटी रुपये आढळले आहेत.
आदर्श म्हात्रे आलिशान जीवन जगत होता.
मर्सिडीजसारखी महागडी कार…
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम…
आणि सोशल मीडियावर लक्झरी लाईफस्टाईल दाखवत तो महिलांना जाळ्यात ओढत होता.
सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर प्रेम… नंतर लाखोंची फसवणूक! ‘लव्ह स्कॅमर’ आदर्श म्हात्रेचा काळा कारनामा
