पुणे

कै. सादबा बाळाजी कोद्रे उड्डाणपुलात भाजप राष्ट्रवादी श्रेयाचे राजकारण ; आमदार योगेश टिळेकरांनी केले उदघाटन

हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
हडपसर मध्ये महापालिकेच्या माध्यमातून बी आर टी साठी आलेले साडेअकरा कोटी भाजप नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये वर्गीकरण करून कै. सादबा बाळाजी कोद्रे या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले याचे फुकटचे श्रेय घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे म्हणून कोणताही प्रोटोकॉल न पाळता राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईने उद्घाटन करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
मगरपट्टा ते मुंढवा या मार्गाला जोडणारा कै. सादबा बाळाजी कोद्रे उड्डाणपुलाचे उद्घाटन आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते व भाजप शिवसेना पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
भाजपचे स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, लताताई धायरकर, हिमाली कांबळे, हडपसर विधानसभा भाजपचे अध्यक्ष सुभाष जंगले सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमित घुले, पुरुषोत्तम धारवाडकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर, संदीप लोणकर, संदीप शेंडगे, डॉ.कुमार कोद्रे, गणेश घुले, सागर बारदेस्कर शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे, शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे, विजय देशमुख, राम खोमणे, विक्रम लोणकर, आदींसह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उड्डाणपुलासाठी वर्गीकरणा द्वारे 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी आम्ही दिला यासाठी नगरसेवक उमेश गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठपुरावा केला शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा ठराव महापालिकेत झाला होता मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घाईघाईत उद्घाटनाचा घाट घातल्याने शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेचा अपमान झाल्याचे योगेश टिळेकर यावेळी म्हणाले.
कै. सादबा बाळाजी कोद्रे उड्डाणपुलाचे नुकतेच काम पूर्ण झाले व वाहतुकीस हा पूल खुला करण्यात आला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये श्रेयाचे राजकारण रंगले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

I have been surfing on-line more than three hours today, but
I by no means discovered any attention-grabbing article like yours.
It is lovely worth enough for me. Personally, if all web owners and bloggers made good
content material as you did, the web will probably
be a lot more useful than ever before.

8 months ago

I’ve read several excellent stuff here. Definitely value bookmarking for revisiting.
I wonder how so much effort you put to create this
sort of great informative site.

5 months ago

When you forget the password to lock the screen, if you do not enter the correct password, it will be difficult to unlock and gain access. If you find that your boyfriend/girlfriend is suspicious, you may have thought about hacking his Samsung phone to get more evidence. Here, we will provide you with the best solution on how to crack Samsung mobile phone password.

5 months ago

Mobile Phone Monitoring App – hidden tracking app that secretly records location, SMS, call audio, WhatsApp, Facebook, Viber, camera, internet activity. Monitor everything that happens in mobile phone, and track phone anytime, anywhere.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x