पुणेहडपसर

“दारू पिताना झालेल्या वादातून मांजरी फार्म भागात खून, हडपसर पोलिसांकडून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर परिसरातील मांजरी फार्म भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. संतोष भास्कर अडसूळ (वय ४१, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल दत्तात्रय घुले (रा. मांजरी) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष आणि राहुल मित्र आहेत. दोघांना दारूचे व्यसन आहे. महिनाभरापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. शनिवारी रात्री ते मांजरी फार्म परिसरातील पडीक जागेत राहुल, संतोष आणि त्यांचे मित्र दारू प्यायला बसले होते. दारू पिताना राहुल आणि संतोष यांच्यात वाद झाला.

 

राहुलने संतोषला मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोषला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. चौकशीत राहुलने बेदम मारहाण केल्याने संतोषचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पसार झालेल्या राहुलला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.