पुणे

पुण्यात कोंढवा-येवलेवाडी मेट्रो! 2030-31 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता ….!

पुणे शहरातील दक्षिण भागासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कोंढवा-येवलेवाडी परिसरासाठी प्रस्तावित उंचावरील मेट्रो मार्ग 2030 ते 2031 दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग शिवाजीनगर ते येवलेवाडी असा असणार आहे. या मार्गामुळे कॅम्प आणि पुलगेट परिसरातून थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.याशिवाय NIBM ते उंद्री दरम्यान स्पर लाइन प्रस्तावित असून त्यामुळे दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

 

सध्या या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे आणि तो 2026 च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मंजुरी प्रक्रिया होणार आहे.
दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक समस्या लक्षात घेता हा मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या मेट्रोमुळे कोंढवा, NIBM, येवलेवाडी आणि आसपासच्या भागांना शहराशी जलद आणि सुलभ जोडणी मिळणार आहे.
ही होती कोंढवा-येवलेवाडी मेट्रो प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती.