पुणे

CID अधिकारी बनून थेट कमिशनर ऑफिसमध्ये! पोलिसांनी घेतली उलटतपासणी आणि भांडाफोड

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून तिघेजण थेट पोलिस आयुक्तालयात पोहोचले. गळ्यात ओळखपत्र, त्यावर भारत सरकारचा उल्लेख, शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या सह्या… पाहता पाहता सर्व काही खरे वाटावे अशी व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना संशय आला. त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. उलटतपासणीत तिघांची भंबेरी उडाली आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला.
आरोपी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते सांगत पोलिस अधिकाऱ्यांसोबत फोटो काढण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांच्या मते, अशा फोटोचा वापर करून बाहेर लोकांना अधिकारी असल्याचा आभास निर्माण केला जातो.
या प्रकरणी तिघांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.