पुणे

मराठी पत्रकार परिषद, हवेली तालुक्याच्या वतीने पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लोणीकाळभोर पोलिसात निवेदन…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन तसेच गुंडाकडून हल्ला व मारहाण केल्या प्रकरणी संबंधित घटनेस जबाबदार असलेल्या सर्व आरोपिंना अटक करून योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मराठी पत्रकार परिषद,हवेली तालुक्याच्या वतीने लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना शनिवारी( दि.12 )निवेदन देण्यात आले.

यावेळी मराठी पत्रकार परिषद हवेली तालुका अध्यक्ष- रमेश निकाळजे, उपाध्यक्ष- स्वप्नील कदम,संघटक- प्रीतम सावंत,सदस्य- फकिरा इनामदार,संजय कुलूत,गणेश जाधव,प्रणव निकाळजे,लखन अस्वरे,अर्पण गायकवाड,सुरज साळुंखे,इत्यादी उपस्थित होते.
पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांचेवर हल्ला करण्यात आला.

या घटनेचा जाहीर निषेध करून या प्रकरणी संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. गुंडाकरवी हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून संबंधीत आमदार व पत्रकारास मारहाण करणारे आमदाराचे गुंड या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद हवेली तालुका यांच्या वतीने करण्यात आली.