पुणे

कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबीर

हडपसर ; -महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सेंटर फॉर एक्सलन्स फॉर मदर ॲण्ड चाइल्ड केअर व रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाऊन यांच्या सहयोगाने आणि जीविका हेल्थकेअर यांच्यामार्फत लसीकरणाचे शिबीर आयोजित केले होते .महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, माळवाडी हडपसर येथे सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी रोजी मुलींना गार्डासील ४ ही गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात आली . रोटरी क्लब ऑफ पुना डाउन टाउन पुणे यांचे प्रेसिडेंट रोटेरियन पी. एन. अय्यर व मेडिकल प्रोजेक्ट हेड चे डॉ. समीर गोसावी यांनी गर्भाशय मुखाचा कर्करोग या लसीच्या बाबतचे महत्त्व विद्यार्थिनींना आपल्या मनोगतात व्यक्त केले.

९ ते १४ या वयोगटातील ३४७ विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात आली .
शिबिराचे उद्घाटन अनिल गुजर सचिव -महाराष्ट आरोग्य मंडळ, रोटरी क्लब ऑफ पुना डाउनटाउन क्लबचे प्रेसिडेंट – पी . एन . अय्यर , माजी प्रेसिडेंट पल्लवी साबळे आणि रोटरी क्लबचे चेअर मेडिकल प्रोजेक्ट हेड – डॉ समीर गोसावी यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी जीविका हेल्थकेअरच्या मोनिका सिंग आणि डॉ. नदीम उपस्थित होते . साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री .सुरेश गुजर व स्वयंसेवक उपस्थित होते.