पुणे

राष्ट्रवादीच्या संघर्षाला यश : भिडे वाडा महानगरपालिकेच्या ताब्यात, राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा साक्षीदार असलेला भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकात रूपांतरित व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होता. आज उच्च न्यायालयाने भिडे वाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने या संघर्षाला निर्णायक यश मिळाले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार  सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः अनेकदा भिडे वाड्यास भेट देऊन तेथील दुकानदार, नागरिक यांच्यासोबत चर्चा केली होती. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या विषयात जातीने लक्ष घालून या संघर्षात आपले योगदान दिले होते. “आजच्या निकालाने आमच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना असून याठिकाणी भव्य स्मारक व्हावे हे स्वप्न पूर्णत्वास जाणार ही बाब अतिशय आनंदाची आहे.” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.