पुणेहडपसर

पर्यावरण दिनानिमित्त साधना विद्यालयात वृक्षारोपण.

हडपसर,वार्ताहार. ‘झाडे लावा निसर्ग वाचवा’ असा केवळ संदेश देऊन चालणार नाही तर कृती करून संदेश देणे गरजेचे आहे.झाडांच्या मुळे निसर्गाचा समतोल टिकून राहतो. वसुंधरा हिरवीगार राहते. झाडे लावली,वाढवली आणि टिकवली तरच पृथ्वीचे अस्तित्व व मानवाचे भवितव्य सुरक्षित राहील. यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.याच अनुषंगाने साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्यु. कॉलेज, हडपसर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. ‘या निमित्ताने 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली.

 

या कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपप्राचार्य डॉ.अमिरुद्दीन सिद्दीकी, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे, पर्यवेक्षिका माधुरी राऊत,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. धनाजी सावंत, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख विजय सोनवणे, व्होकेशनल विभाग प्रमुख पांडूरंग गाडेकर,राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, व साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.