सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून गॅस एजन्सींवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पुण्यातील Hadapsar परिसरात आज एक वेगळीच घटना घडली.
रस्त्यावर भरलेले सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीवर पोलिसांनी कारवाई सुरू केली असताना नागरिकांनी गाडी अडवत गॅस घेऊन जाऊ नका अशी विनंती केली.
“गाडीवर दंड मारा पण सिलेंडरची गाडी घेऊन जाऊ नका, आम्हाला गॅस मिळू द्या,” अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली.
या घटनेची माहिती मिळताच क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अमोल नाना तुपे यांनी मध्यस्थी करत
अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त Ashok Bankar यांच्याशी फोनवर संपर्क साधला.
नागरिकांच्या विनंतीचा विचार करून अतिक्रमण विभागाने गॅसच्या गाडीवरील कारवाई थांबवली आणि सिलेंडर वितरणाला परवानगी दिली.
गाडी सुटताच नागरिकांनी आनंद व्यक्त करत अमोल नाना तुपे यांचे आभार मानले.
