पुणे

वाढदिवसाचा जल्लोष टाळून समाजसेवा! | अमोलनाना तुपेंचा आदर्श उपक्रम

वाढदिवस म्हणजे शुभेच्छा, सत्कार आणि जल्लोष असा सर्वसाधारण समज असतो. मात्र क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोलनाना तुपे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
अमानोरा सिटी, साडेसतरानळी येथे आयोजित कार्यक्रमात अमोलनाना तुपे यांनी नेत्रतपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला.
यावेळी आमदार चेतन तुपे, हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांतमामा तुपे, भूषण तुपे, दादा कोद्रे, मारुती आबा तुपे, सतीश भिसे, दादा अहिरे, देवा भाट, विक्रम लोणकर, राम खोमणे, दिलीप देवकर, दिलीप व्यवहारे, संदीप नाना तुपे, बाळासाहेब घुले, मोहन घुले, प्रदीप घुले, प्रशांत सुरसे, विजयराव देशमुख, बच्चूसिंग टाक, सुहास खुटवड, बापू पठारे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अमोलनाना तुपे यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच शाळा-महाविद्यालयांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या अमोलनाना तुपे यांनी वाढदिवसाचा आनंद गरजूंमध्ये वाटून घेत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
त्यामुळे हा वाढदिवस केवळ वैयक्तिक उत्सव न ठरता सामाजिक संवेदनांचा, सेवाभावाचा आणि लोकहिताचा संदेश देणारा उत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.