पुणे

MSEB अधिकाऱ्यांवर अरेरावीचा आरोप! आंदोलनकर्त्यांचा अपमान केल्याचा संताप

ग्रामीण भागातील MSCB अधिकाऱ्यांच्या वर्तनावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांनी MSCB चे अधिकारी निलेश रासकर यांच्यावर अरेरावी, अपमानास्पद भाषा आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठांकडे तक्रार का केली याबाबत जाब विचारत रासकर यांनी अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांबाबत “नाटक करताय” आणि “लोकांची माथी भडकावता” अशा शब्दांत अपमान केल्याचा आरोप आहे.
याशिवाय, “मुद्दाम लाईट बंद करतो, काय करायचं ते करा” आणि “५० तासांचा शटडाऊन घ्या, नाहीतर तोंड बंद ठेवा” अशा धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.