पुणे

बिग ब्रेकिंग….. हडपसर-मांजरीच्या भाजप आमदाराच्या आशीर्वादामुळे एक हजार कोटीचा घोटाळा ; माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांचा खळबळजनक आरोप : मांजरीत आमदारांच्या वरदहस्तामुळे बॅकडेटेड बांधकाम परवान्यांचे वाटप ; न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार माहिती अधिकार कार्यकर्ते – रवींद्र बऱ्हाटे

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
हडपसर जवळील मांजरी ग्रामपंचायतमधील काही माजी पदाधिकाऱ्यांनी बनावट शिक्के आणि लेटरहेड चा वापर करून 2009 सालच्या खोटे बॅकडेटेड परवाने दिले आहेत या ग्रामपंचायतीमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे यामुळे हा प्रकार हडपसरच्या आमदार योगेश टिळेकर यांच्या वरदहस्तामुळे घडला असून कोट्यवधी रूपयांची माया गोळा करण्यात आली आहे.
तर पीएमआरडीए व शासनाचा जवळपास एक हजार कोटींचा महसूल बुडाला आहे या प्रकाराबाबत लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहे अशी माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहराच्या चारही बाजूंनी विस्तार होत आहे त्यामुळे सर्वच भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत हडपसर मधील मांजरी परिसरातही बांधकामे सुरू आहेत येथील विकसकाने बांधकाम व्यवसायिकांनी राज्य शासन आणि पीएमआरडीए चा जवळपास एक हजार कोटींचा महसूल बुडविला आहे
याबाबत पीएमआरडीए व मांजरी ग्रामपंचायतीमध्ये निवेदने दिली आहेत सन 2004 ते 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या मिळकतींवर जानेवारी 2009 रोजी ग्रामपंचायत मांजरी बुद्रुक यांनी संबंधित जागेवर घर दुरुस्ती चे खोटे परवाने आणि बांधकाम नकाशे दिले आहेत त्याचा वापर करून शासन आणि पीएमआरडीची परवानगी न घेता या भागात बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे तर येथील बांधकाम व्यवसायिक नोंदणीकृत दस्ताने सदनिकांची विक्री सुरू आहे आहे
यामध्ये पीएमआरडी ला माहिती देण्यात आली आहे,
मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून बेकायदेशीर इमारतींऐवजी गरिबांच्या घरावर हातोडा मारला जात आहे, या प्रकरणात खासदार संजय काकडे यांचा भाऊ सूर्यकांत काकडे यांच्या नावाचा वापर केला जात आहे सदर प्रकरणी सहनिबंधकांकडे या भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधातील सर्व कागदपत्रांसह तक्रार करणार आहे यामध्ये आमदार योगेश टिळेकर, यांच्यासह बेकायदा बांधकाम व्यवसायिक, मांजरी ग्रामपंचायत मधील भ्रष्ट पदाधिकारी, आणि पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही बऱ्हाटे यांनी सांगितले.

भाजपचे योगेश टिळेकर वादातीत आमदार
हडपसर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच भाजपमधून निवडून आलेले आमदार योगेश टिळेकर यांची पाच वर्षांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे, त्यांच्यावर पाच वर्षात अनेक आरोप झाले असून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते करीत. आगामी काळात विधानसभा निवडणुकीत आमदार योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली जाते की पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

slot hoki Jackpot everyday with GCSLOT

2 months ago

Ordinafy soap is not suitable simply becausee Ԁoes not lock involving moisture fߋr thhe hair approach ɑ shaving preparation cream or gel ⅾoes.

Apply aѕsociated with shaving foam ߋr gel over tһe ɑrea and leave for seveгal minutes tо soften further.

mү web-site :: skemca 500 mg precio en Toliman Jalisco

1 month ago

When someone writes an post he/she retains the thought of a user in his/her brain that how a user can be aware of it.
Therefore that’s why this piece of writing
is great. Thanks!

22 days ago

I’m truly enjoying the design and layout of your blog.
It’s a very easy on the eyes which makes it much more
enjoyable for me to come here and visit more often. Did you hire out a developer to create your theme?

Superb work!

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x