पुणे

अमित शहांसोबतच्या गुप्त भेटीच्या बातम्यांवर जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण; मी अमित शहा यांना भेटलोच नाही…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : मी अमित शहा यांना भेटलोच नाही असे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. देशाचे गृहमंत्री अमित शाह आज ८ जुलै पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगितलं जातं होतं. देशाचे गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगितलं जातं होतं. पण, या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.

माझ्याबद्दल चुकीची माहिती सांगून महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरु झाला आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना फटकारलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, “रोज सकाळी उठून स्पष्टीकरण देण्याचा उद्योग सुरु केला आहे का? तुम्ही माझ्याविषयी बातम्या तयार केल्यात, तर तुम्हीच त्या बंद करा. मी कुठेही कुणालाही भेटायला गेलो नाही. मी जर गेलो असेल तर त्याचे पुरावे असतील किंवा माहिती मिळाली, तरच बातम्या करा. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग करून बदनाम करू नका. असे करणे बरोबर नाही. माझ्याविषयी सकाळपासून बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे.

“अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी रात्री दोनपर्यंत पवार साहेबांच्या घरीच बसलो होतो. मग पुण्याला कधी गेलो ? काल संध्याकाळ पासून ते आज सकाळ पर्यंत मी शरद पवारांच्या घरीच होतो. मग मी अमित शाहांना कधी भेटलो? याचं संशोधन करा, कुठे जायचं असेल, तर नक्कीच भेटल्यावर सर्वांना सांगेन. पण, विनाकारण चुकीच्या बातम्या न्युज चॅनेल वाले चालवतात. मी घरीच आहे. मात्र मी अमित शहा यांना पुण्यात भेटायला गेलो अशा बातम्या प्रसारित केल्या जात आहेत.असेही जयंत पाटील सांगितलं.