पुणेमहाराष्ट्र

कदमवाक् वस्ती गावच्या उपसरपंच पदी नासीर खान पठाण यांची बिन विरोध निवड

प्रतिनिधी स्वप्नील कदम

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नासीरखान मनुलाखान पठाण बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळत्या उपसरपंच राजश्री काळभोर यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. रिक्त पदासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शनिवारी (ता. ५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

गुलाल व फटाके फोडून कार्यकर्त्यानी केला जल्लोष
उपसरपंच पदासाठी नासीरखान पठाण व मंदाकिनी नामुगडे यांचे अर्ज आले होते. मात्र मंदाकिनी नामुगडे यांनी वेळेच्या आगोदर अर्ज माघारी घेतला. म्हणून उपसरपंच पदासाठी नासीरखान पठाण यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी नासीरखान पठाण यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली.

तर ग्रामविकास आधिकारी अमोल घोळवे यांनी या निवडणूकीचे शासकीय कामकाज पाहिले. दरम्यान, नासीरखान पठाण यांची उपसरपंचपदी निवड होताच, कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच नासीरखान पठाण यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनेसरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी सत्कार केला. यावेळी कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, मंदाकिनी नामुगडे, स्मिता लोंढे, अविनाश बडदे, दीपक अढाळे, स्वप्नील कदम, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड, सोनाबाई शिंदे, कोमल काळभोर, बिना काळभोर, सुनंदा काळभोर, रुपाली काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य शरीफ खान, इरफान शेख, समीर खान, फिरोज मेटकरी, शब्बीर पठाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच नासीरखान पठाण म्हणाले की, “कदमवाकवस्ती गावचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला उपसरपंचपदाची संधी दिली आहे. यामुळे आगामी काळात सरपंच व सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सर्वाना बरोबर घेऊन अत्यावश्यक असलेली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”