पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील शिवचैतन्य कॉलनी क्रमांक १ आणि २ मधील रहिवाशांनी आज लोणी काळभोर अप्पर तहसीलदार आणि संबंधित तलाठी कार्यालयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. रामोशी वतन असलेल्या भोगवटा क्रमांक १ जमिनीवरील रहिवाशांना शर्तभंग या कारणाने नजराणा भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ते २०११ पूर्वीपासून या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षांपूर्वी कष्टाची कमाई करून या जागा विकत घेतल्या आहेत. शासन २०११ पूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये घरे नियमित करण्याची भूमिका मांडत असताना, आमच्यावर मात्र जमीन सरकारजमा करण्याच्या आणि मोठ्या रकमेचा नजराणा भरण्याच्या नोटिसा का काढल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रहिवाशांचा आरोप आहे की, मांजरी बुद्रुक परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून एन.ए. परवानगी, रॉयल्टी, उत्खनन परवानगी आणि इतर आवश्यक शुल्कांशिवाय मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट सर्वसामान्य नागरिकांना तलाठी कार्यालयातील कर्मचारी घरासमोर येऊन दमदाटी करतात, “तुमची प्रॉपर्टी सरकार जमा करू, घर पाडू,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला.
यावेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, आमच्यावरील कारवाई तात्काळ थांबवावी. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे धरणे आंदोलन करून न्यायाची मागणी करण्यात येईल.
या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये किर्ती मंगेश जाधव, ललिता सागर बालगुडे, शितल राम भालके, लता लक्ष्मण भालके, मनिषा नवनाथ दिघे, जयश्री पद्माकर आंबे, सुनिता रमेश होळकर, मनिषा कैलास चौधरी, विजया संतोष जाधव, रोहिणी संजय जाधव, सीमा बापू डाळींबकर, शालन अभिमान शिरसाट, सविता मधुकर थोरात, पूजा मोहन कामठे, कृपाली विश्वास गायकवाड, नूतन विकास बारकुंड, राणी संजय जाधव, सीमा शांताराम कांचन, विठाबाई अंबादास गायकवाड, अनिता पोपट जाधव, विजया जोतिबा रोमण, सुवर्णा सुभाष ठेंगल, मंगेश मधुकर जाधव, सागर भिमाशंकर बालगुडे, लक्ष्मण पंढरीनाथ भालके, राम पंढरीनाथ भालके, रमेश आदिनाथ होळकर, कैलास किसन चौधरी, संतोष चंद्रकांत जाधव, अदिश संजय जाधव, संजय चंद्रकांत जाधव, बापू बाळकृष्ण डाळींबकर, अभिमान परशुराम शिरसाट, मोहन नामदेव कामठे, विश्वास अंबादास गायकवाड, विकास बन्सी बारकुंड, संजय भानुदास जाधव, शांताराम रघुनाथ कांचन, सुभाष जगन्नाथ ढेंगल अनिल अंबादास गायकवाड आणि जोतीबा मारुती रोमण यांचा समावेश होता.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित महसूल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणानंतर लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व इनाम वर्ग सहा तसेच भोगावटा क्रमांक दोन जमिनीसोबत पाटील वतन ,कुलकर्णी वतन ,महार वतन यामधील काही जमिनींचे शेती प्रयोजनासाठी नजराने भरून घेऊन ज्या ठिकाणी शेती ना विकास झोन मधील जमिनीचे तुकडे पाडून अनाधिकृत प्लॉटिंग डेव्हलपर्स बिल्डर भूमाफीया यांनी मोठ्या प्रमाणात जमिनीचे शर्तभंग केले आहेत या प्रकरणानंतर अप्पर तहसीलदार लोणी काळभोर कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व भोगवटा क्रमांक दोनच्या जमिनींची पुनर पडताळणी स्थानिक तहसीलदार करणार आहेत का..? की मांजरी बुद्रुक येथील रहिवाशांनी केलेले आरोप प्रमाणे पूर्व हवेलीतील बिल्डर डेव्हलपर्स लोकांना यातून सूट मिळणार ,शासनाचा कोट्यवधी रुपयांचा दंड शर्तभंग करणाऱ्या पूर्व हवेलीतील बिल्डर व प्लॉटिंग डेव्हलपर्स च्या जमिनीतून स्थानिक तहसीलदार,तलाठी, मंडळ अधिकारी शासनाचा दंड किती प्रमाणात कारवाई करून वसूल करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे
