पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज व्यक्तिविशेष स्टोरी.. रोगाला चितपट करणारे खरे “व्हॅकसिन हिरो” हजारो युवकांच्या हाताला दिला रोजगार उद्योजक – डॉ. सायरस पूनावाला

जगातील 170 पेक्षा अधिक देशांमध्ये नवजात बालकांना पोलिओ पासून ते गोवर, हिपॅटायटीस पर्यंतच्या विविध लसीचा पुरवठा अनेक गरीब देशांमध्ये असाध्य व्याधींवरील उपचारांसाठी आवश्यक लसींची उपलब्धता, स्वाईन फ्लूसारख्या संसगर्जन्य या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात पहिल्या लसीचा शोध आणि उत्पादन कोरोनावरही लस शोधण्यासाठी अथक संशोधन…. हे सगळे संशोधन निर्मिती, वितरण आणि उपलब्धता यात अनेकांचे हात असले तरी खरा चेहरा आहे सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांचा…
लसीच्या दुनियेतील या बादशहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर “व्हॅकसिन हिरो” असेच संबोधले जाते.
सध्या उभा राहिलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पूनावाला यांच्यासारख्यांच्या कार्याची महती अधोरेखित होते, गरजू आणि शोषितांच्या कल्याणासाठी खजिना रिकामा करणारे अशीही त्यांची ओळख आहे.
डॉ. सायरस पूनावाला हे विविध प्रकारच्या जीवनरक्षक लसीचे उत्पादन करणारे आघाडीचे उद्योजक. घरांमध्ये अश्व पालनाचा व्यवसाय असताना त्याच्या मर्यादा ओळखून डॉ. पूनावाला यांनी सरकारी हाफकीम संस्थेला घोडे दान केले. घोड्यांच्या सिरम पासून लसीचे उत्पादन करता येऊ शकते हे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले.
आणि 1966 मध्ये सिरम इन्स्टिट्यूट ची स्थापना झाली. विविध आजारांच्या संसर्गाने ग्रासलेल्या लहान बालकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी लसनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात जगाच्या नकाशावर लसनिर्मितीत पुण्यासह देशाचे नाव उज्वल केले, जीवरक्षक लसीच्या माध्यमातून जीवदान देतानाच ही सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली. डॉ. पूनावाला यांच्या सिरम संस्थेने आतापर्यंत घटसर्प, गोवर, डांग्या खोकला, रेबीज, टिटॅनस, क्षयरोग, शीतज्वर, मॅनिंन्जायटिस, पोलिओ, रोटाव्हायरस, हिपॅटायटिससारख्या रोगांवरील लसीची निर्मिती केली. अकरा वर्षांपूर्वी देशात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूच्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस बाजारात आणली होती या लसीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रोगप्रतिकारशक्ती च्या रूपाने जीवनदान देण्याची महत्त्वाची कामगिरी केली त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूट आणि सायरस पूनावाला कायम पुणेकरांच्या आदरस्थानी राहिले आहेत. आज पर्यंत जगातील 170 पेक्षा अधिक देशांमध्ये सिरमने तयार केलेल्या लसी वापरल्या जात असून आतापर्यंत कोट्यवधी बालकांना लसीमुळे संजीवनी मिळाली आहे.

डॉ.सायरस पुनावाला अन पुण्याची जवळीक
डॉ. सायरस पूनावाला यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील पदवी संपादन केली त्यांना पुण्याविषयी विशेष आस्था आहे. विविध संस्था, संघटनांना सढळ हाताने मदत केली आहे. पुण्याच्या स्वच्छता मोहिमेतही त्यांच्या मुलाने “आदर पूनावाला क्लीन सिटी” मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून व्यापक जनजागृती केली आहे.

“जगात थैमान घातलेल्या कोरोनावर लस”
स्वाइन फ्लूची लस तयार करण्यासाठी तंत्रज्ञान तयार होते त्यामुळे कमी कालावधीत लक्ष निर्मिती करणे शक्य झाले कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करण्याच्या दृष्टीने आमच्या कंपनीचे वेगाने प्रयत्न सुरू आहे.
डॉ.सायरस पूनावाला
संस्थापक अध्यक्ष -सिरम इन्स्टिट्यूट पुणे

हजारो रोजगार निर्मिती करणारे बाबा खरे हिरो
हडपसर व मांजरी परिसरामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीच्या माध्यमातून हजारो गोरगरीब मुलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने आज हडपसर व पंचक्रोशीतील हजारो कुटुंबाचे पालन पोषण केले जात आहे, म₹सायरस पूनावाला यांचे कामगारांवर अतिशय प्रेम असून त्यांनी वेळोवेळी कामगारांसाठी मोलाची मदत केल्याने ते खऱ्या अर्थाने उद्योजकांमध्ये हिरो आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x