पुणे

महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनत आहेत आमदार रोहित पवार, “दर्दी चहा” या चहाच्या दुकानाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार रोहित पवार यांच्या हस्ते “दर्दी चहा” या चहाच्या दुकानाचे उद्घाटन पार पडले.महाराष्ट्रातील तरुणांसाठी दर्दी चहाच्या माध्यमातून “युवा रक्षक संघटना” रोजगाराची एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे त्यामुळे तरुणांना त्यांच्या असणाऱ्या भांडवलामध्ये स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू करता येणार आहे तसेच त्यांना कमी भांडवला मध्ये मोठा मोबदला व त्यांच्याच गावांमध्ये हा व्यवसाय सुरू करतात येणार आहे,त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात या शाखा देण्यात येणार असल्याचे युवा रक्षक संघटनेचे अध्यक्ष विनोद बेंगळे यांनी या वेळी सांगितले.

रोहित पवार हे शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आपली एक योग्य पकड निर्माण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून संघटन तसेच पक्ष बांधणीचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य ते करताना वेळोवेळी दिसत आहे त्यांच्या या शैलीमुळे लोकांमध्ये मिसळून काम करणे व त्यांच्या सुख दुःखामध्ये हजेरी लावण्याच्या कलेमुळे व त्यांच्या स्वभावामुळे ते तरुणांमध्ये एक वेगळा ठसा उमटवत आहे आज देखील त्यांनी छोट्याशा दुकानाला भेट देऊन उद्घाटन केले व तेथे जमलेल्या अनेक तरुणांना आपलेसे करून घेतले.

आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (युवक) डॉ.शैलेश मोहिते पाटील या वेळी उपस्थित होते तसेच युवा रक्षक संघटनेचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता.या सर्वांचे आभार अमित कुचेकर यांनी मानले व लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात अशा अनेक शाखा सुरू करून तरुणांना रोजगार निर्मिती करण्याचे कार्य करू असेही ते यावेळी म्हणाले. या चहाच्या शाखे विषयी संपर्क करण्यासाठी खालील क्रमांक देण्यात आले आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x