पुणे

सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्यात यावा; पुणे महापालिकेत ठराव मंजूर

 

पुणे (प्रतिनिधी)

ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला तर 1890 मध्ये निधन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 तर निधन 1897 मध्ये. आपल्या एकूण आयुष्यामध्ये या जोडप्याने केवळ समाजसेवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा दूर करण्यासठी प्रयत्न केले.
सावित्रीबाई फुले(Savitribai Jyotirao Phule) आणि महात्मा ज्योतिराव फुले (Jyotirao Phule) यांना भारतरत्न (Bharat Ratna) देऊन गौरविण्याची मागणी गेली अनेक वर्षे होते आहे. याबाबत पहिले पाऊल पडले आहे. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार देण्याबाबत गेली अनेक वर्षे मागणी होत आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे भारतातील महिला शिक्षणाचे प्रथम प्रणेते आहेत. फुले दाम्पत्यास मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार घोषीत करावा यासाठी पुणे महापालिकेत ठराव मंजूर झाला. महापालिकेत याबाबतचा ठराव काँग्रेस नेते उल्हास बागू यांनी मांडला. त्यास सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांन एकमताने पाठिंबा दिला. आता हा ठराव राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
महात्मा फुले आणि ज्योतिराव फुले यांचे समाजसुधारणेबाबत महान कार्य आहे. त्यांनी आयुष्यभर स्त्रीशिक्षण आणि समाजसूधारणा यासाठी मोठे काम केले. महात्मा फुले यांनी प्रथम आपल्या पत्निला शिक्षित केले. त्यानंतर पत्नीच्या मदतीने पहिली महिला शाळा काढली. त्यामुळे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा बहुमान सावित्रीबाई फुले यांना जातो.

ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला तर 1890 मध्ये निधन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 तर निधन 1897 मध्ये. आपल्या एकूण आयुष्यामध्ये या जोडप्याने केवळ समाजसेवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा दूर करण्यासठी प्रयत्न केले.
भारतरत्न मिळालेले पुण्यातील प्रख्यात

महर्षि धोंडे केशव कर्वे (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ)

पंडित भीमसेन जोशी (प्रख्यात गायक)

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याबाबत पुणेकरांमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात प्रचंड आदराची भावना आहे. आज ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करुन ठेवलेले महात्मा फुले यांचे निवासस्थान फुले वाडा आजही पुणे शहरात मोठ्या दिमाखात उभा आहे. पुणे विद्यापीठालाही सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या नावाने शिष्यवृत्तीही देण्यात येते. दरम्यान, फुले दाम्पत्यास अद्याप भारतरत्न मिळाला नाही. म्हणून पुणे महापालिकेने हा ठराव मंजूर केला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x