अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना धमकी मिळाल्याच्या चर्चांवर अखेर त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी स्पष्ट केलं की, त्यांना कोणतीही नवीन धमकी आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप ही सुमारे दहा वर्षांपूर्वीची असून ती पुण्यातील असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
“धमकीची चर्चा चुकीची आहे, आता मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया,” असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचंही स्पष्ट केलं.
तसंच, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वाहतुकीवर कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलं.
भेसळीविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशाराही मुंढेंनी दिला आहे.
