घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.
सरकारने आता LPG e-KYC अनिवार्य केली आहे. जर तुम्ही अजून केवायसी पूर्ण केले नसेल तर तुमचे गॅस बुकिंग थांबू शकते आणि सबसिडीही बंद होऊ शकते.
बनावट आणि डुप्लिकेट गॅस कनेक्शन रोखण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी करण्यासाठी
तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत अॅप डाउनलोड करा किंवा वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर 17 अंकी LPG आयडी, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि आधार वापरून लॉगिन करा.
यानंतर e-KYC किंवा Aadhaar Update पर्याय निवडा.
Face RD अॅपद्वारे फेस व्हेरिफिकेशन करा आणि ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
जर अॅप काम करत नसेल तर तुमच्या गॅस एजन्सीला भेट देऊन ऑफलाइन केवायसी देखील करता येते.
लक्षात ठेवा…
केवायसी न केल्यास गॅस डिलिव्हरी रद्द होऊ शकते आणि तुम्हाला ₹300 ते ₹400 सबसिडीचा फायदा गमवावा लागू शकतो.
म्हणून लगेच तुमची LPG e-KYC पूर्ण करा.
