पुणेमहाराष्ट्र

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपार गुंडाची पोलिसांकडून कुंजीरवाडी परिसरात धिंड

प्रतिनिधि- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -कुंजीरवाडी परिसरामध्ये जवळ कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी चक्क कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात त्याची धिंड काढली.

योगेश शांताराम लोंढे (वय ३२, धंदा मजुरी, रा. जुन्या कॅनोलजवळ, माळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची येथे एका वडाच्या झाडाखाली हातात लोंखडी कोयता घेऊन एक इसम थांबल्याची माहिती
बुधवारी (ता. ६) सायंकाळी ७ च्या सुमारास खबऱ्या मार्फत मिळाली.
त्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे व
पोलीस कर्मचारी पोचले असता त्या ठिकाणी उजव्या हातात लोंखडी कोयता घेऊन एक इसम थांबलेला आढळून आला. पोलिसांना पाहून तो पळ काढू लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असणारा १०० रु किंमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

आरोपीविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार सतिश सायकर, पोलीस अंमलदार योगेश पाटील, निखील पवार, प्रशांत सुतार, सागर कदम, बाजीराव वीर, चक्रधर शिरगीर यांच्या पथकाने केली आहे.