पुणे

“82 वर्षांच्या आजोबांना ‘व्हर्च्युअल कोर्ट’ दाखवून 10.75 कोटींची फसवणूक! Pune Mega Cyber Scam”

“आजोबांना एक फोन आला… आणि पुढे जे झालं ते ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील!
पुण्यातील ८२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला चक्क ‘CBI अधिकारी’ नावाखाली फोन आला.

समोरचा म्हणाला — “तुमचं नाव जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात आलं आहे.”
त्यांनी भीती दाखवली की २४ बँक खात्यांतून बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत… आणि तुम्हाला ७ ते ९ वर्षांची शिक्षा होऊ शकतेयाच भीतीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ मध्ये ठेवले —
ज्येष्ठ नागरिकांना कोणाशीही बोलू दिलं नाही.

 

यानंतर तर कमालच!
व्हिडीओ कॉलवर चोरट्यांनी खोटं ‘व्हर्च्युअल कोर्ट’ तयार केलं —   जज, सरकारी वकील… सगळं बनावट!त्या फसव्या कोर्टाने आदेश दिला ……….“तुमची सर्व संपत्ती सरकारी पडताळणीसाठी जमा करा.”

 

 

दबावाखाली येऊन ज्येष्ठ नागरिकांनी FD तोडल्या
आणि तब्बल १०.७५ कोटी रुपये ७ वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर केले!नंतर जेव्हा त्यांनी मुलीला सांगितलं… तेव्हा कळलं — हे सगळं सायबर गँगचं फसवणूक जाळं होतं. सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.”**