पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ भीषण अपघातात उरुळी कांचन येथील २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव अनिकेत सूर्यकांत पिठे असे असून, तो सोमवारी दुपारी दुचाकीवरून पुण्याकडून उरुळी कांचनकडे जात होता.
कुंजीरवाडी हद्दीतील थेऊर फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव आयशर टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर अनिकेत रस्त्यावर फेकला गेला आणि टेम्पोचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
थेऊर फाट्यावर भीषण अपघात! उरुळी कांचनच्या तरुणाचा जागीच मृत्यू
