आज आपण पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर तक्रारीबाबत बोलत आहोत.
ही तक्रार आहे शोभना विशाल भोसले – डिकळे, वय ३०, रा. हडपसर, पुणे यांची. पुण्यात आधीच तीन महिलांना होण्यासाठी छळ झाल्याने आत्महत्या करावी लागली आहे. त्यातच हे नवे प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलीस गांभीर्याने घेणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, विशाल शिवाजी भोसले याने आधीच लग्न झालेले असतानाही घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून तिच्याशी ८ मे २०२४ रोजी विवाह केला. नंतर हे लग्न फसवणुकीवर आधारित असल्याचे समोर आले.
लग्नानंतर काही महिन्यांतच तिला साडेसहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाहीत तर नांदवणार नाही, जीवे मारू, अशा धमक्या देण्यात आल्या.
या छळात पतीसोबतच जाऊ ललगून गावच्या सरपंच असलेल्या पूजा विजय भोसले आणि दिर विजय शिवाजी भोसले यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.
तक्रारदार महिलेचा आणखी गंभीर आरोप म्हणजे, तिच्या इच्छेविरुद्ध दोन वेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. औषधं देऊन गर्भपात केल्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
इतकेच नाही, तर पती आणि जाऊ यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत तिने रंगेहाथ पकडल्याचाही दावा केला आहे.
सतत संशय, धमक्या आणि मानसिक छळामुळे आपण आत्महत्येचा विचार करत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
सध्या या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून महिला आयोगाकडेही दाद मागण्यात आली आहे.
तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याने तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे.
आता प्रश्न असा आहे —
👉 अशा प्रकरणात दोषींवर कधी कारवाई होणार?
👉 पीडित महिलेला न्याय कधी मिळणार?
