पुणे

मावळ हादरलं! जाधववाडी धरणात तिघांचा मृत्यू

मोठी बातमी मावळ तालुक्यातून समोर येत आहे. नवलाख उंब्रे परिसरातील जाधववाडी धरणात दुर्दैवी घटना घडली असून, पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा जण दुपारच्या सुमारास धरणात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडाले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे उर्वरित तिघांना वाचवण्यात यश आलं.

 

 

घटनेची माहिती मिळताच NDRF, अग्निशामक दल आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवलं.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून नागरिकांना पाण्यात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.