पुणे

“डोळा मारला व मारहाण केली असा खोटा गुन्हा हडपसर पोलिसांनी केला दाखल” पोलिसांकडून अन्याय झाल्याचा प्रशांत वनवे यांचा दावा

पुणे (प्रतिनिधी)

डोळा मारून फ्लाईंग किस का केला असे विचारताच महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा गुन्हा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे प्रत्यक्षात असा प्रकार घडला नसताना खोटा गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रशांत वणवे यांनी रोखठोक महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.

यासंदर्भात प्रशांत वनवे म्हणाले, सविस्तर हकीकत अशी की मी मध्य प्रदेश मधील उज्जैन येथून निघालो असताना इंदोरमध्ये असताना हडपसर पोलीस स्टेशन मधून 20 मार्च रोजी फोन आला मला तातडीने पोलीस स्टेशनला यायला सांगितले, मी दूर असल्याचे सांगताच मला पोलिसांनी शिवीगाळ केली, मी हडपसर मध्ये आलो असताना रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला डोळा मारून फ्लाईंग किस करुन हाताने इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा गुन्हा आम्हा दाम्पत्यावर दाखल करण्यात आला आहे. सचिन वसंत पवार व त्याच्या पत्नीने खोटी तक्रार दिल्याचे ऐकून मला धक्का बसला,

 

सदरचा बनाव केलेला प्रकार हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे बुधवारी (दि. १३ मार्च) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला असे फिर्यादीत म्हटले आहे, प्रत्यक्षात माझ्या पत्नीचे व त्याचे वादविवाद झाले होते, माझ्या पत्नीला त्याने शिवीगाळ केल्यामुळे त्या दोघांचा वाद झाला होता, माझा कोणताही वाद तेव्हा झाला नव्हता तरीही माझ्या विरोधात त्याच्या पत्नीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

सचिन वसंत पवार हा आमच्या दारासमोर दारू पिऊन सिगारेट ओढत बसतो माझ्या पत्नीने जाब विचारला त्यातून वाद झाला परंतु परिसरातील नागरिकांनी समजून सांगितल्यावर आम्ही आपसात वाद मिटविला होता, परंतु पुन्हा त्यांनी जाऊन पोलिस स्टेशन मध्ये खोटी तक्रार देऊन आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे, यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात जाणार आहे.

महिलेने तक्रार दिली मारहाण केल्याची या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे, वादामध्ये कोणीही मारहाण झाली नाही असाच दावा करतात प्राथमिक माहिती घेऊन तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष पांढरे

वरिष्ठ पोलीस निरीक्षकह – डपसर पोलीस स्टेशन

https://www.youtube.com/watch?v=8PgxtucbYbAhttps://www.youtube.com/watch?v=8PgxtucbYbA