पुणे

“हडपसर विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटलांना पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य – प्रमोद नाना भानगिरे… “अक्षय आढळराव पाटील यांचा हडपसर मध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद..

हडपसर (स्वप्निल कदम )
हडपसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप बरोबर असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना या निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देणार असा विश्वास शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे आणि त्यांची महायुती मधून उमेदवारी पक्की समजली जात आहे, या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव अक्षय आढळराव पाटील यांनी प्रमोद नाना भानगिरे यांची भेट घेऊन शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी अक्षय आढळराव पाटील यांचा सत्कार करून शब्द दिला की हडपसर विधानसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील खासदार असताना अनेक विषय मार्गी लागले आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, मागील निवडणुकीत 5000 ची आघाडी होती या निवडणुकीत 50 हजार हून अधिक आघाडी देऊन आढळराव दादांना पुन्हा संसदेत पाठविणार, यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील आढळराव दादांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकी प्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रवक्ता अभिजीत बोराटे, उपशहर प्रमुख संतोष रजपूत, विकी माने, युवा सेना उपशहर प्रमुख काका पवार, हडपसर प्रमुख योगेश जोशी, महिला आघाडी शहर उपाध्यक्ष आयोध्या आंधळे, सारिका पवार, जिल्हा उपप्रमुख अमर घुले, शहर उपसंघटक दीपक कुलाळ, विभाग प्रमुख अक्षय तारू, अभिमन्यू भानगिरे, बबन आंधळे, सचिन तरवडे, शाखाप्रमुख संतोष जाधव, भाजपचे योगेश सूर्यवंशी, सचिन भानगिरे, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहिल्याच बैठकीत अक्षय आढळराव पाटील यांना चांगलाच प्रतिसाद लाभला, शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा निर्णय समजला जातो, महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष या मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला जास्तीचे मताधिक्य देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील. आढळराव पाटील यांचे निष्ठावंत प्रमोद नाना भानगिरे यांनी हडपसर मधून प्रचाराच्या जोरदार कामाला सुरुवात केली आहे.