पुणे

“राष्ट्रवादीने पेटवली निष्ठावंत विरोधात हुकूमशाहीची होळी… “खा.अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते प्रज्वलन…

“होळी” या सणाचे आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. पवित्र अग्नीमध्ये वाईट प्रवृत्तींचा विनाश करणारा हा उत्सव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने दर वर्षी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मागील वर्षी “भ्रष्टाचाराची होळी” साजरी करण्यात आली होती. यावर्षीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने देशात फोफावलेल्या “हुकुमशाहीचे दहन” करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.अमोल कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते कात्रज आगम मंदिराजवळ “हुकुमशाहीची होळी” प्रज्वलित करण्यात आली.

“होळी भ्रष्टाचाराची, होळी हुकूमशाहीची, होळी संविधानाच्या मारेकऱ्यांची, होळी
विरोधकांना तुरुंगात डांबणाऱ्यांची, होळी इलेक्टोरल बॉण्ड्स घोटाळ्याची, होळी पक्ष फोडणाऱ्यांची, होळी
कुटुंब फोडणाऱ्यांची, होळी खोट्या आश्वासनांची, होळी खोट्या जुमल्यांची, होळी धार्मिक उन्मादाची, होळी जातीभेदाची, होळी म्हणजे आसुरी प्रवृत्तीचा नाश करणारा पवित्र सण, मोदी सरकारचे दहन करूया भ्रष्टाचाराचा, हुकूमशाहीचा, संविधानाच्या मारेकऱ्यांचा, पक्ष फोडनाऱ्यांचा, कुटुंब फोडणाऱ्यांचा, धार्मिक उन्मादाचा, जातीभेदाचा नाश करूया” अशा आशयाचे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या या अनोख्या होळीची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळाली.