पुणे ः प्रतिनिधी
हडपसरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, श्रेयवादासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. हडपसर गाडीतळ येथील बंटर बर्नाड स्कूलमधील लसीअभावी बंद ठेवले होते. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे येणार असल्याने सुरू ठेवले होते. त्यामुळे श्रेयवादासाठी राजकरण करण्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका, असा खडा सवाल काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे यांनी विचारला. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी काम केले जात असून यामध्ये श्रेयवादाचे राजकारण आणू नये असे माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या, लॉक डाऊन असताना खासदारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा वाद चर्चेचा विषय बनला होता.
सुरसे म्हणाले की, लस द्यायची नव्हती तर नागरिकांना अगोदर का सांगितले नाही, ज्येष्ठ आणि अपंग नागरिक उन्हातान्हात आले, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, ही बाब मी सहन करणार नाही. लसीकरण केंद्र मी सुरू केले आहे. मला श्रेय नको आहे, नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी काम करीत आहे. मात्र, काही मंडळी राजकारण करीत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही, तुम्ही आणि मी एकत्र आहोत, असे सांगतो. मात्र स्थानिक मंडळी याचे राजकारण करीत आहेत, ही बाब त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर मांडली. गोंधळेनगरमधील मनपाच्या बनकर शाळेत कोविड सेंटर सुरू केले आहे. तेथे पाणी, टेस्ट कीट कमी पडत आहेत, कोविड तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, महिलांना स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, श्रेयवादासाठी नगरसेवक लुडबूड करीत आहेत. मात्र, त्यामुळे कोरोनाबाधितांची हेळसांड होत आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ नको आहे, मी नागरिकांसाठी काम करत आहे. मला राजकारण करायचे नाही, अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढाही त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदारांसमोर मांडला. यावेळी खासदारांनी आपण सर्वजण नागरिकांना सुविधा देण्यासाठी काम करीत आहोत, असे सांगून प्रकरणावर पडदा टाकला.
हडपसरमधील स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे म्हणाल्या की, हडपसरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, प्रशासनाकडून याची योग्य दखल घेतली जात नाही. रेमडिसिव्हर इंजेक्शन, कोरोना लस, ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, त्यामुळे कोरोनाबाधित आणि त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असून, श्रेय लाटण्यासाठी मात्र नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहे, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरण केंद्र व कोव्हीड टेस्ट सेंटर मध्येजे पाहिले येतील त्यांना टोकन दिले जातील, हे दहा टोकन मागत आहेत हे योग्य नाही, ऑनलाईन दुपारी साडेबारानंतर बोलावतो, आज लसीकरण केंद्र बंद होते, खासदारांना सिस्टीम कळावी म्हणून 50 लस घेऊन केंद्र सुरू ठेवले, यामध्ये काही राजकारण नाही महामारीचा भयंकर काळ आहे सर्वांना विश्वासात घेऊन नागरीकांना सेवा देण्याचे काम गुणवत्तेने व्हावे, कोणीही राजकारण करू नये.
वैशाली सुनील बनकर
माजी महापौर
