पुणेमहाराष्ट्र

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सायबर सुरक्षा आणि जाणीव जागृती या विषयावर व्याख्यान

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सायबर सुरक्षा आणि जाणीव जागृती (Cyber security and digital safety) या विषयावर अश्विनी देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते.

सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट फोनचा वापर केला जातो, गुगलच्या माध्यमातून सर्च केले जाते. सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सप, इन्स्टाग्राम यावर मोठया प्रमाणावर लोक वेळ घालवत असतात. यावर आपण काय शेअर केले पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे मत अश्विनी देसाई यांनी व्यक्त केले.

मोबाईल ही आपल्या नित्य वापराची बाब झाली असून त्याचा वापर करताना सुरक्षेच्या दृष्टीने आपणच खबरदारी घेतली पाहिजे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. प्रताप बामणे, प्रा. सविता मालुसरे, प्रा. सीमा शेटे, प्रा. प्रवीण वायदंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री अकोलकर यांनी केले तर आभार प्रा. विलास शिंदे यांनी मानले.