पुणे

शिवसेना घराघरात मनामनात ; हडपसर मध्ये राबविला उपक्रम : सोसायटी समस्यांबाबत साधला नागरिकांशी संवाद

शिवसेना घराघरात मनामनात या धोरणानुसार मंगळवार प्रभाग क्र.23 हडपसर मधील अनेक सोसायट्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट दिली. सोसायट्यांना काही नागरी समस्या  असल्यास त्यांनी आपल्या समस्या शिवसेनेने दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर व ई-मेल वर पाठवाव्यात यासंदर्भात भारत फोर्ज सोसायटी, अरुणोदय सोसायटी, हर्षद अपार्टमेंट आणि अमित हाईट्स सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सोसायटीतील नागरिकांबरोबर अनेक नागरी विषयांबाबत माहिती घेतली. त्यातून कसा मार्ग काढावा याबाबत सकारात्मक चर्चा झाली. शिवसेनेच्या कार्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे नियोजन प्रभाग क्र.23 हडपसरचे प्रभाग प्रमुख अमित गायकवाड यांनी केले. यावेळी जयेश शेवाळे, मोहन बलाई, रुषीकेश कदम, रुषीकेश वर्मा आणि इतर वगैरे उपस्थित होते. शिवसेनेच्या या उपक्रमासाठी मार्गदर्शन माजी आमदार महादेव अण्णा बाबर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख शसमीर तुपे, हडपसर विधानसभा प्रमुख तानाजी लोणकर, विभाग प्रमुख प्रशांत पोमण, उपविभाग प्रमुख
महेंद्र बनकर, गणेश जगताप, जेष्ठ शिवसैनिक सुरेश हडदरे, प्रभाकर कदम, दौलत सावंत, चंद्रकांत सातव आणि सोशल मिडिया प्रमुख राजेश शेलार यांनी केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

Simply want to say your article is as astonishing.
The clarity to your submit is just spectacular and that i could think you are a professional in this subject.
Fine along with your permission allow me to grab your feed to keep updated with impending post.
Thanks 1,000,000 and please carry on the gratifying work.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x